लंकेच्या स्कीमची जादू… 20 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोधच्या दिशेने

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने आमदार निलेश लंके यांनी एक मोठी घोषणा केली होती.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावाच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी घ्या अशी घोषणा लंके यांनी केली होती. लंकेच्या या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे.

कारेगाव व पानोली ग्रामस्थांनी आज बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला.आ. लंके यांच्या या भूमिकेचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यानी स्वागत केले असून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून काम करण्याची घोषणाही हजारे यांनी केली आहे.

दरम्यान आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनीही आ. लंके यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविली आहे.

तसेच पारनेर तालुक्यातील सुमारे 20 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रक्रियेत असून येत्या दोन दिवसांत आणखीही काही गावांच्या निवडणुका बिनविरोध होतील, असे चित्र असल्याचे अ‍ॅड. राहुल झावरे यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24