या सरकारचा पायगुणच संकटी… त्याचा त्रास जनतेला भोगावा लागत आहे – डाॅ. सुजय विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रातील सरकार लोकनियुक्त नसून षडयंत्रातून तयार झालेले आहे. हे सरकार आल्यापासून वादळ, कोरोना, अतिवृष्टी अशी एकामागून एक संकटे सुरू आहेत.

या सरकारचा पायगुणच संकटी आहे. त्याचा त्रास जनतेला भोगावा लागत आहे, अशी टीका खासदार डाॅ. सुजय विखे यांनी केली. वाळकी येथे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वतीने आयोजित जिल्हा बँकेच्या खेळते भांडवल कर्ज वितरणप्रसंगी विखे बोलत होते.

आमदार बबनराव पाचपुते, बँकेचे संचालक दत्ता पानसरे, सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, सरपंच स्वाती बोठे, भाऊसाहेब बोठे, शरद बोठे, श्रीकांत जगदाळे, दिलीप भालसिंग, रमेश धोंडे यावेळी उपस्थित होते. खासदार विखे म्हणाले, सध्याचे मुख्यमंत्री सत्तेत नव्हते,

त्यावेळी एकरी ५० हजार भरपाई द्या अशी मागणी करत होते, पण आता सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळे झाले. केंद्राकडे ३८ हजार कोटी येणे आहे असे सांगत आहेत. मी ते ३८ हजार कोटी आणतो, तुम्ही ते सगळे शेतकऱ्यांना देणार का, तेवढे जाहीर करा.

आज सत्ताधारी जी काही भूमिपूजने करत आहेत, त्यांची मंजुरी भाजप सरकारच्या काळातील आहे. विधानसभा निवडणुकीनंतर समज-गैरसमज झाले, पण आता ते सगळे संपले आहे. कर्डिले यांनी मला मुलगा समजून सगळे काही समजून घेतले आहे.

यापुढे आम्ही एकत्र राहणार असून पुढे काय काय होते त्याचे परिणाम दिसून येतील. साकळाई योजनेच्या सर्व्हेसाठी आम्ही अडीच कोटी दिले होते, पण ते सुद्धा अजून देण्यात आलेले नाहीत. लवकरच साकळाईसाठी लढा उभारू, असे विखे म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24