अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळगाव परिसरात अवघ्या चार वर्षीय चिमुकल्या मुलीला घरातून उचलून नेऊन तिच्यावर तुरीच्या शेतात बलात्कार करणारा नराधम
आरोपी सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या(वय 32 वर्ष,रा.-जळगाव,तालुका-राहता) याला श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या टीमने पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे पकडून रविवारी मध्यरात्री अटक केली.
बलात्काराचा गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार हा झाला होता.परंतु श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तपास कौशल्याचा वापर करून अवघ्या 36 तासांमध्ये त्याला जेरबंद करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहे. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुरसे यांच्यासह पोलीस हवालदार श्री.गोरे,पोलीस नाईक श्री.रन्नवरे ,
पोलीस नाईक श्री.वैरागर व वाहन चालक पोलीस नाईक श्री.पठाण यांचा समावेश होता. या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी सिकंदर शेख याला गंगापूर येथुन रात्री ताब्यात घेतले.
सदरची कारवाई श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.राहुल मदने,चार्ज श्रीरामपूर व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री.मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.