चार महिन्यांपूर्वीच झाल होत लग्न, आज एका चुकीमुळे झाला दुर्दैवी मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-नगर तालुक्यातल्या खडकी येथील एमएससीबीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचा शॉर्टसर्किटमुळे मुत्यू झाला. ही घटना बाबुर्डी बेद येथे आज सकाळी दहा वाजता ही घडली.

रुपेश सुखदेव बहिरट ( वय -२६, रा. खडकी, ता. नगर) असे मयत कंत्राटी कर्मचार्‍याचं नाव असून अवघ्या चार महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते. बाबुडी बेंद (ता. नगर) येथे वीजेचा बिघाड झाला होता.

या भागात काम करणारे वायरमन यांनी रूपेश बहिरट यास वीजेच्या पोलवर जाण्यासाठी सांगितले. त्याचवेळी वीजप्रवााह सुरु असल्यामुळे पोलवरून तो खाली पडला,आणि त्याचा जागीच मुत्यू आला.

दरम्यान, या कंत्राटी कामगाराला पन्नास लाख रुपयांची मदत मिळावी, या मागणीसाठी एम एस सीबीच्या कार्यालयाजवळ मुतदेह ठेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यासंदर्भात जोपर्यंत अश्वासन देत नाही, तोपर्यत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका यावेळी नातेवाईकांनी घेतली. अधिकाऱ्यानी बळजबरीने बाहिरट यांना पोलवर चढण्यासाठी सांगीतले.

बहिरट यांच्याकडे हे गाव नसताना बळीचा बकरा बनवण्यात आला. पोलवर जाण्याचे काम वायरमनचे असते. मात्र याला कोणत्या अधिकारात पोलवर चढवयात आले.

जोपर्यत बहिरट यांच्या कुंटुबाला मदत मिळण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यत इथून जाणार नाही, असे हराळ यांनी यावेळी सांगीतले. यावेळी अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ,जि.प. सदस्य संदेश कार्ले,

माजी सभापती रामदास भोर, बाजार समिती सभापती अभिलाष घिगे , रेवणनाथ चोभे , दिलीप भालसिंग , शरद बोठे , जनाधन माने, प्रमोद कोठुळे, अरुण कापसे, सुधीर भापकर सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24