व्यापाऱ्यास मारहाण करून लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : कापड दुकान बंद करून रात्रीच्यावेळी घरी जात असलेले व्यापारी कमलेश अमरलाल अहुजा (रा.द्वारकानगर, बालिकाश्रमरोड) यांना पत्रकार चौकात तिघांनी दुचाकी आडवी लावून धक्काबुकी करत त्यांच्याजवळील ६० हजारांचा ऐवज लुटून नेला.

याप्रकरणी अहुजा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अहुजा यांनी शुक्रवारी (दि. १३) रात्री एमजीएम रोडवरील कापड दुकान बंद करून दुचाकीवरून घराकडे चालले होते. साडेनऊच्या सुमारास पत्रकार चौकातील आल्यानंतर दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना दुचाकी आडवी लावली.

तिघांनी अहुजा यांना धक्काबुकी करत त्यांच्या जवळील रोख रक्कम, सोन्याची चैन, हातातील अंगठी, बँग, कागदपत्रे असा ६० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

याप्रकरणी अहुजा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24