अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथील विवाहितेने पोटच्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेतली. आईचा मृत्यू झाला, मुली सुदैवाने बचावल्या.
सोनाली संतोष तुपे (२५) या महिलेने रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कौटुंबिक वादातून आरोही (अडीच वर्षे) व सई (चार वर्षे) या मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सोनालीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विहिरीतील मोटरीच्या दोरीला धरल्याने सईचा जीव वाचला. आरोहीच्या अंगातील फ्रॉकचा फुगा तयार झाल्याने ती पाण्यात तरंगत राहिली.
देव तारी त्याला कोण मारी, असाच काहीसा प्रकार या दोन्ही लहान मुलींबाबत घडला. सोमवारी शिराळ येथे पोलिस बंदोबस्तात सासरच्या दारासमोर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, डमाळवाडी येथे रविवारी शेळ्या चारण्यासाठी गेलेली महिला चातुराबाई सुदाम डमाळे (४०) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com