रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींची नाव उघडकीस, घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांची सोमवारी जातेगाव फाट्याजवळ हत्या करण्यात आली होती. या आधी तीन जणांना अटक करण्यात आली होती. आता आणखी दोघांना अटक झाल्याने अटक केलेल्याची संख्या पाच झाली आहे.

घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी) व आदित्य सुधाकर चुळके (कोल्हार बुद्रूक) या आरोपींना अटक केली होती त्यानंतर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे.

सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोन्ही आरोपीना दुपारी पारनेर न्यायालयात हजर करणार आहेत.

हत्येतील मुख्य सूत्रधाराच्या मागावर पोलीस आहे. दरम्यान सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे़.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24