कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. पूर्वीप्रमाणे बाधितांची संख्या वाढत नसली तरी देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येतच आहे.

श्रीरामपूर तालुक्यात काल एकूण 13 रुग्ण करोनाबाधित आढळून आले असून तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 3048 पर्यंत जाऊन पोहोचला आहे.

काल श्रीरामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 39 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली. यात केवळ 6 जण पॉझिटिव्ह तर 33 जण निगेटिव्ह आढळले.

जिल्हा रुग्णालयात 6 तर खासगी प्रयोगशाळेतील 1 असे 13 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत.काल 39 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत.

काल एकूण 26 जणांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 04 रुग्ण उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 12027 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24