अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान करोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे.
श्रीरामपूर तालुक्यात काल एकूण 07 रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा तीन हजार पार झाला आहे. सध्याच्या स्थितीत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ०८१ झाली आहे.
काल श्रीरामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 76 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली. त्यात एकही पॉझिटीव्ह आढळला नाही.
जिल्हा रुग्णालयात 04 व खासगी प्रयोगशाळेतील 3 असे 07 करोना बाधित आढळून आले आहेत. 9 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. श्रीरामपूर येथील सरकारी कोविड सेंटरमध्ये यात 07 रुग्ण उपचार घेत आहेत.
तर 15 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 12263 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली.