अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : पारनेर तालुक्यातील म्हसणेफाटा एमआयडीसीतील एका बड्या कंपनीच्या व्यवस्थापकास कोरोनाची बाधा झाली. रूग्ण व कंपनी व्यवस्थापन कोणतीही माहिती देत नसल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
हा व्यवस्थापक ७ जूनला विमानाने दिल्लीहून पुण्यात आला. तेथून मोटारीने वाघुंडे शिवारातील हॉटेलमध्ये आला. ८ रोजी ताप आल्याने तो स्वतः नगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल झाला.
अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तालुका प्रशासनास समजल्यानंतर पोलिसांनी विविध कंपन्यांशी संपर्क साधून कोणी व्यवस्थापक दिल्लीहून आला आहे का, याची माहिती विचारली.
परंतु एकाही कंपनीने माहिती दिली नाही. व्यवस्थापकही स्वतःच्या नावाशिवाय काहीही माहिती देण्यास नकार देत आहे. त्याची कंपनी, नातेवाईक, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी मौन बाळगले आहे.
व्यवस्थापकाने दिल्लीहून येताना प्रशासनाची परवानगी घेतलेली नसावी. त्याने स्थानिक प्रशासनास माहिती देणे बंधनकारक होते. तशी कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews