निष्क्रीय सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- शेतकरी बांधवांच्या संवेदनाची कदर न करणाऱ्या राज्य सरकारला जागे करून दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांचे स्मरणपत्र पाठवून महादूध आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारला बळीराजाच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने भाजप महायुती हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आंदोलनावेळी दिला.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवण्याच्या महादूध एल्गार आंदोलनाची सुरुवात कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथील टपाल कार्यालयात करण्यात आली.

जिल्ह्यातून सुमारे २० हजार पत्र पाठवण्यात येणार आहेत. भाजपचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खैरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे बाळासाहेब पानगव्हाणे,

शहराध्यक्ष वैभव आढाव, महिला आघाडीच्या योगिता होन, शिल्पा रोहमारे, विजय आढाव, महावीर दगडे, दत्ता काले, दीपक गायकवाड, सतीश केकाण, भीमा संवत्सरकर, कोंडाजी दरगुडे, प्रभाकर शिंदे, सखाराम शिंदे,

अशोक शरमाळे, अशोक पवार, कैलास सानप, शहाजादी पठाण, चंद्रभान शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी कोल्हे म्हणाल्या, सध्याच्या कोरोना परिस्थीतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

कांद्याचे भाव कोसळल्यामुळेही शेतकरी अडचणीत आहे. अशा विविध संकटाचा सामना करीत असलेल्या बळीराजावर दुःखाचे सावट आहे. परंतु राज्यातील निष्क्रीय सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.

दुधाचे दर एवढे कमी नसतानाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुधाला ५ रुपये प्रतिलिटर अनुदान खात्यावर जमा केले होते. त्या वेळच्या पेक्षाही दुधाला दर कमी असूनही हे सरकार काही करत नाही.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24