….डील होण्याआधीच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात वाळूतस्करांनी धुमाकूळ घातला आहे. कायद्याचा धाक या वाळूतस्करांच्या मनात राहिलेला नाही. मात्र अशा वाळूतस्करांना गजाआड करण्यासाठी पोलीस पथके देखील सरसावले आहे.

नुकतेच एका तस्कराला कर्जतमध्ये अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाळूतस्करीची डील करण्यासाठी आलेल्या वाळू तस्कराला अटक करण्यात आली आहे.

त्याच्याकडून पिष्टल, गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. पो. नि. यादव यांच्या आदेशाने कर्जत पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक गस्त करत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून याबाबतची माहिती मिळाली होती.

यामध्ये पप्पू नावाचा इसम हा शिंपोरा येथे वाळूची डील करण्यासाठी येणार असून त्याच्याजवळ पिष्टल आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रझशेखर यादव याची पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांच्या पथकाने शिंपोरा रोडवर सापळा लावुन एक संशयित चारचाकी वाहन अडविले. त्यातून गाडीचा चालक पांडुरंग ऊर्फ पप्पु सतिश कवडे, (वय 24, रा. कात्रज ता. करमाळा) याच्या गाडीमधून पिष्टल,

एक फावड्याचा प्लास्टीकचा दांडा, एक वायर रोप, 400 रुपये रोख, एक व्हीडीआय चार चाकी गाडी असा मिळून एकूण 5 लाख 25 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला.

अहमदनगर लाईव्ह 24