अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे मुंबईहून आलेल्या एका पोलिसाला कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी दिली.
मुंबई येथील कळंबोली सेक्टर ४ मधून तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे १ जून रोजी संबंधित ४८ वर्षीय पोलिस आला होता. त्रास जाणवल्यानंतर संबंधित व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
गुरुवारी सांयकाळी संबंधित पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याची महिती कळताच तालुका आरोग्य विभागाने चिंचपूर इजदे येथे जात संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयितांना ताब्यात घेण्याचे काम चालू केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews