अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला गोपनीय विभागात काम केलेले मनमिळावू व सरळ स्वभावाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल रामदास हापसे, वय ४० यांची आत्महत्या त्यांची पत्नी व पोलीस नाईक खंडागळे यांच्या अनैतिक संबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असुन त्यामुळे पोलिसानेच पोलिसाचे जीवन उद्ध्वस्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
काल याप्रकरणी मयत हेकॉ विशाल हापसे यांचे भाऊ देवेंद्र रामदास हापसे, रा. देहरे, ता. नगर यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी पत्नी सोनाली विशाल हापसे, मूळ रा. देहरे, हल्ली रा. तनपुरे गल्ली राहुरी, पोलीस नाईक विशाल खंडागळे, नेमणूक शिर्डी पोलीस ठाणे यांच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीत भाऊ देवेंद्र हापसे यांनी म्हटले आहे की, त्याची भावजयी सोनाली विशाल हापसे व तिचा प्रियकर पोलीस नाईक विशाल खंडागळे यांच्यातील असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधास भाऊ पोलीस हेकी विशाल हापसे हे अडसर येत असल्याने त्या दोघांनी संगनमत करुन बायको सोनाली ‘हिने विशाल खंडागळे आणि माझे संबंध आहे.
तू आमच्यातून बाजूला हो, नाहीतर तुला मारुन टाकू, असा दम पती विशाल हापसे याला दिल्याने तसेच भावजयी सोनाली हिने पुतण्या साईश्वर यास तुझा बेत पाहिल, असे म्हणून शिवीगाळ करून दमदाटी करून धमकी दिली. यातून विशाल रामराव हापसे याने विष पिवून राहुरीत रहात्या घरी आत्महत्या केली.
घटनास्थळी डिवायएसपी मिटके यांनी भेट दिली. राहुरीचे पोनि हनुमंत गाडे हे पुढील तपास करीत असून आरोपी पत्नी सोनाली विशाल हापसे हिला अटक करण्यात आली असून फरार पोलीस कर्मचारी विशाल खंडागळेचा ‘पोलीस कसून शोध घेत आहेत.
ज्या दिवशी पोलीस हापसे यांनी आत्महत्या केली तेव्हाच श्रीरामपूर परिसरातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी नाजूक संबंधाची माहिती खाजगी बोलताना सांगितली व असे व्हायला नको, आरोपीला शासन व्हायला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या होत्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved