खड्यांचे राजकारण! आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- शहरात तसेच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणी रस्त्यांवरील खड्यांबाबत आक्रमक झाले आहे. या मध्ये विशेष बाब म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या खड्यांच्या विषयवार आक्रमक झाले आहे.

यामुळे सत्ता कोणत्या राजकीय पक्षाची आहे हेच कळत नाही सध्या जे चालले हे सर्व नौटंकी आहे. म्हणजेच मी मारल्या सारखे करतो तू रडल्या सारखे कर बाकी दुसरे काही नाही.

ज्यांच्या हातात सत्ता आहे ते ही आंदोलन करतात याचा अर्थ प्रशासन यांना जुमानत नाही किंवा यांनी प्रशासनासमोर नांग्या टकले असे दिसून येतेय. दरवर्डही लाखो रुपये खर्च करून रस्ते बनतात व ते लगेच खराब होतात.

याला जबाबदार कोण? हे विचारण्याची हिंमत ना प्रशासनात आहे ना सत्ताधाऱ्यांत सर्वचजण या मध्ये बरबटलेले आहेत. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.

राजकीय नेत्यांना तसेच काही लोकप्रतिनिधींना नगरचे काही घेणे राहिले नाही. फक्त ज्याला त्याला आपला स्वार्थ पडलाय. महापालिकेच्या सत्ताधाऱ्याना अधीकाऱ्यांना काळे फासण्याची वेळ का आली

याचा अर्थ प्रशासन तुम्हाला जुमानत नाही व प्रशासनावर तुमचा वाचक नाही. अधिकाऱ्यांना काळे फासू, आंदोलन करू हे सर्व नाटक करण्यापेक्षा सत्य परिस्तिथी सर्व राजकीय पक्षांनी समजावून घेऊन एक जुटीने नगर शहराचा विकास करावा

. नगर चा विकास होण्याचे दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन नगर शहराचा विकास कसा होईल याचे व्हिजन करून काम करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24