मध्यरात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत …पिके झाली भुईसपाट !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-विजांच्या कडकडाटासह रविवारी रात्री झालेल्या पावसाने राहुरी तालुक्याला अक्षरश झोडपून काढले. उभी पिके भुईसपाट झाली.

अनेक झाडे उन्मळून पडली. रविवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. मध्यरात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता.

मानोरी, वळण, मांजरी या भागात पावसाबरोबर गाराही पडल्या. पावसामुळे काही भागातील उभी पिके भुईसपाट झाली.

झाडे उन्मळून पडली. सडे-वांबोरी रस्त्यावरील रेल्वेस्टेशनजवळील बोगद्यात पाणी साचल्याने वांबोरीकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24