नगर मध्ये कोरोनाचा धोका अधिकच वाढला 22 कोरोनाबाधित रुग्ण आढळले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :   शहरात गेल्या पाच दिवसात 22 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा आकडा आतापर्यंत शहराच्या दृष्टीने उच्चांकी आहे. नगर शहरात संसर्गाचा अधिकच धोका वाढला आहे.

कंटेनमेंट झोन वगळता नगर शहरात बाजारपेठ सुरू आहे. त्यामुळे हा धोकाच अधिकच वाढला असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकरांकडून सांगण्यात आले.

नगर शहरात पुणे रोडवरील सथ्था कॉलनी, माळीवाडा, मार्केटयार्ड परिसरातील भवानीनगर, नेप्ती रोडलगत असलेल्या लालनगर, केडगाव आणि स्टेशन रोडवरील भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.

सथ्था कॉलनीत पाच, माळीवाड्यात सात, मार्केटयार्ड भागातील भवानीनगरमध्ये सहा, नेप्ती रोडलगत असलेल्या लालनगर भागात दोन, केडगाव आणि स्टेशन रोडवरील परिसरात प्रत्येक एक, असे दोन रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

गेल्या पाच दिवसात नगर शहराती तीन भाग कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सथ्था कॉलनी, मार्केटयार्ड भागातील भवानीनगर परिसर आणि माळीवाड्याचा समावेश आहे.

माळीवाड्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा सात आहे. त्यातच हा भाग गर्दी आणि वर्दळीचा आहे. त्यामुळे शहराला धोका अधिकच वाढला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24