“कोपरगाव ते नगर रस्ता दुरुस्तीसाठी पुढचे वर्ष उजाडणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते, यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यां या सध्या चांगल्याच गाजत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व होणे अपेक्षित असून मात्र मान्सून परतीला निघाला तरी रस्त्यांची दुर्दशा तशी आहे.

यामुळे नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील नगर – जामखेड, नगर – मनमाड या रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे. यातच आता नगर – कोपरगाव रस्त्यांचा विषय समोर आला आहे.

कोल्हार ते कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मार्च महिन्यापासून 65 लाख रुपये खर्च झाले. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला; मात्र अद्याप त्याचे तसे रूपांतर झालेले नाही,

अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात देण्यात आली. “कोपरगाव ते नगर या महामार्गाची दुरुस्ती “टोल’वसुली करणारा ठेकेदार करीत नसल्यामुळे “टोल’वसुली स्थगित करावी,’

अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल होती. यावर उच्च न्यायालयाने 10 जानेवारी रोजी “टोल’वसुलीस मुदतवाढ देऊ नये व या रस्त्याची दुरुस्ती राज्य सरकारने करावी,

असा आदेश दिला होता. प्रत्यक्षात राज्य सरकारनेदेखील रस्त्याची दुरुस्ती न केल्याने तो आणखी खराब झाला. अपघातांचे प्रमाण वाढले. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

त्यावर राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले, की रस्तादुरुस्तीसाठी 75 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे ही रक्कम देणे स्थगित ठेवण्यात आले.

गेल्या मार्चपासून काही ठिकाणचे खड्डे बुजविण्यासाठी 65 लाख रुपये खर्च झाले. तथापि, येत्या तीस जानेवारीपर्यंत या रस्त्याची डागडुजी चांगल्या पद्धतीने केली जाईल. आश्वासन मिळाले मात्र प्रत्यक्षात हा रस्ता कधी सुधारणार याकडे नागरिक लक्ष ठेवून आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24