त्या दरोडेखोरांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना शहर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री गुंजाळवाडी रस्त्यावरील हॉटेल रानजाईच्या बोगद्याजवळ करण्यात आली.

ही टोळी संगमनेरातील आहे. तिघांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुंजाळवाडी रस्त्यावर ५ जण लोकांना अडवून लूट करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली.

देशमुख त्यावेळी गस्त घालत होते. कॉन्स्टेबल अमित महाजन, महादेव हांडे, शिपाई सचिन उगले, ज्ञानेश्वर सोनवणे, शरद पवार या पथकाने घटनास्थळ गाठले. पोलिसांची चाहूल लागताच कार सोडून दरोडेखोरांनी शेतातून पळ काढला.

मात्र, पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग करत तिघांच्या मुसक्या आवळल्या. दोघे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. क्रेटा कार (एमएच १२, एमएफ ३६८४), तीन मोबाइल, स्क्रू ड्रायव्हर असा ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला.

असीफ अन्सार पठाण (३१, नायकवाडपुरा), तन्वीर काशीद शेख (३६, दिल्लीनाका), भूषण बंडू थोरात (२९, घुलेवाडी) यांच्यासह फरार अमोल जोंधळे (गुंजाळवाडी), बबलू ऊर्फ फिटर (संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24