अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- केडगाव येथील कांदा मार्केट जवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मला अडवून टेप्मोची काच फोडली व माझ्याकडील एक लाख 97 हजार रूपयांची रक्कम लुटून नेली अशी फिर्याद कोतवाली पोलिसांकडे एका ट्रकचालकाने केली होती.
परंतु ही लूट नसून याच ड्रॉयव्हरने हा बनाव मित्रांच्या मदतीने आखल्याचे कोतवाली पोलिसांनी उघड केले. या लुटीच्या बनावात टेम्पो चालक प्रदीप सोन्याबापू शिरसाठ (रा. गंगादेवी ता. आष्टी जि. बीड),
साहील जामदार शेख (रा. बोल्हेगाव, नगर), प्रकाश चंद्रकांत भाकरे (रा. नागापूर) या आरोपीना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ट्रासपोर्ट व्यवसायिक शरद दशरथ रोडे (वय- 34 रा. नागापूर) यांनी फिर्याद दिली होती.
फिर्यादी यांचा ट्रासपोर्टचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांनी टेम्पो (क्र. एमएच- 16 सीसी- 7594) वरील चालक प्रदीप शिरसाठ याला पुणे येथून नवीन एक्साईट बॅट्री आणण्यासाठी गुरूवारी पहाटे चार वाजता एक लाख 97 हजाराची रक्कम दिली होती.
शिरसाठ याने पाच वाजता फिर्यादी यांना फोन करून सांगितले की, केडगाव येथील कांदा मार्केट जवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मला अडवून टेप्मोची काच फोडली व माझ्याकडील एक लाख 97 हजार रूपयांची रक्कम लुटून नेली.
झालेला प्रकार शिरसाठ याने कोतवाली पोलिसांकडे सांगितला असता यामध्ये तफावत आढळून आली आणि पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com