देशसेवा करण्याचं त्याच स्वप्न अधुरेच राहिले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- देशसेवेचे व्रत अंगीकारून अनेक तरुण मोठ्या जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास सुरुवात करतात.

अगदी खडतर प्रवास करून काहींनाच या ठिकाणी आपले भविष्य आजमावता येते. मात्र अंगावर वर्दी येण्याआधीच एका मोठ्या संकटाने होत्याचे नव्हते करून ठेवले आहे.यामुळे देशसेवा करण्याचं त्याच स्वप्न अधुरेच राहिले आहे.

पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथील साहेबराव अजीनाथ जायभाये (वय २०) याने बारावीनंतर सैन्यदलात भरती होण्यासाठी जीवाचे रान केले.बीड येथे सैन्यदल भरतीत तो सहभागी झाला. सर्व तपासणीत तो उत्तीर्ण झाला.

त्याने एक नोव्हेंबरला परिक्षा दिली आणि २० नोव्हेंबरला त्याची सैन्यदलात निवड झाली. २३नोव्हेंबरला त्याला पुण्याला हजर होण्याचं पत्र आल्यानंतर साहेबरावचा आनंद गगनात मावेनासा झाला.

सैन्यदल भरतीच्या निवडीनंतर तो शनिशिंगणापुर येथील शनिदेवाचं दर्शन व उसतोडणीसाठी सोनईत आलेल्या आई-वडिलांचा आशिर्वाद घेण्यासाठी रविवार (ता. २२) रोजी मोटारसायकलवर आला.

शनिदर्शनानंतर मुळा कारखान्यावर येताना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली आणि या अपघातात त्याचा ऊजवा पाय निकामी झाला आहे. भूमीहीन असलेला जायभाये परीवार या घटनेनंतर मोठ्या दुःखात सापडला आहे.

आई कुसूम, वडील अजीनाथ, मामा बाबासाहेब पालवे व मावसभाऊ कृष्णा पालवे रात्रीपासून ढसाढसा रडत मदतीची याचना करत आहेत.

अपघातानंतर त्या युवकाची मोटारसायकल सुध्दा चोरीला गेली आहे. दरम्यान मेहनतीने मिळवलेले त्याच यश पुन्हा हिरावले आहे. या घटनेमुळे परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24