अंगाचा थरकाप उडवणारी घटना : ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले तोच व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन समोर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एका व्यक्तीचा मृत्यू झाला. व त्यानंतर अंत्यसंस्कार झाले आणि तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन समोर आला तर ?

होय अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना पंजाबमध्ये घडलेली आहे. एका व्यक्तीला मृत्यूनंतर पुरण्यात आलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मृत व्यक्ती चक्क घरी परतली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ज्याचा मृत्यू झाला असं समजण्यात आलं त्या व्यक्तीचं नाव मोहम्मद असलम आहे.

मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी जेव्हा असलम त्याच्या घरी परतला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

ज्याचा मृत्यू झाला म्हणून पुरण्यात आलं तो असलम नसून दुसरीच कुणीतरी व्यक्ती असल्याचं पुढे स्पष्ट झालं.

मोहम्मद असलम हा प्रचंड व्यसनी आहे. त्याला असलेल्या व्यसनामुळे तो बऱ्याच वेळा घरातून तीन ते चार दिवस गायब असे.

कधी–कधी तर तो यापेक्षाही जास्त दिवसानंतर घरी येत असे. त्यांच्या घरच्यांनीसुद्धा त्याचं व्यसन सोडवण्यासाठी मोठा प्रयत्न केला.

पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतरही तो व्यसनापायी दिवसेंदिवस गायब राहत असे.

एका असलम नावाच्या व्यक्तीचा मृतदेह स्थानिक बस स्थानकावर सापडला असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आलं होतं.

त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी असलमच्या अंत्यसंस्काराची तयारी केली आणि तो मृतदेह पुरण्यात आला.

या सर्व घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर मोठी शोककळा पसरली होती.

पण खरं तर ज्या मृत व्यक्तीला असलम समजून पुरण्यात आलं तो असलम नाही तर तो मुहम्मद खालिद होता.

स्थानिक तपासानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या सर्व घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये आणि आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24