अहमदनगर Live24 :- अवैध दारू विक्रीची माहिती गावकरी व पोलिसांना दिल्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीला धारधार हत्याराने भोकसून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लुक्यातील म्हाळादेवी (ता. अकोले) येथे शुक्रवारी घडली.
जखमी महिलेस उपचारासाठी अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु महिलेची प्रकृती नाजूक असल्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेबाबत अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे. म्हाळादेवी परिसरातील आदिवासी कुटुंबातील काही व्यक्ती गावठी दारू तयार करून विक्री करतात.
याप्रकरणी एका महिलेने यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पतीने पत्नीला या बाबत जाब विचारला. त्यांच्यात वादावादी झाली. यातून पतीने रागाच्या भरात पत्नीला धारधार हत्याराने भोकसून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थांनी संबंधित महिलेस उपचारासाठी अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. महिला गंभीर जखमी असल्याने नाशिकला हलवण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®