अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : रस्त्याने जाणाऱ्या दुकानदार आत अडवून तिघांनी मारहाण करून लुटले. स्टेशन रस्त्यावरील हॉटेल अशोका समोरील छावणी मंडळच्या ट्रान्सपोर्ट समोर रात्री पावणेबारा वाजता ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, अशोक मटुमल मेहतानी (रा. भिंगार) हे दुचाकीवरून रस्त्याने चालले होते. हॉटेल अशोका समोरील छावणी मंडळाच्या ट्रान्सपोर्टसमोर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले.
अंधाराचा फायदा घेऊन मारहाण केली. त्यांच्याकडील ४० हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हँडसेट हिसकावून घेतला. त्यानंतर तिघेही पसार झाले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.