महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न तथाकथित समाज सेवकांनी केला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची खोटी माहिती देऊन महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न तथाकथित समाज सेवकांनी केला असल्याची तक्रार शनिवारी संगमनेर शहर पोलिसात निवेदनाद्वारे केली.

अ‍ॅड. गोरक्ष कापकर, राहुल भोईर, सुदाम ओझा, सुनील खरे, दिनेश जाधव यांनी या संदर्भात निवेदनातून म्हटले आहे की, राज्य सरकारच्या वतीने डॉ. भवर यांनी पीसीएनडीटी अ‍ॅक्टचे कलम २८ प्रमाणे आर.सी.सी. नंबर २०७/२०२० अन्वये दाखल केले आहे.

शुक्रवारी केसचे कामकाज आदेशावर नेमण्यात आले होते. परंतु कोर्टाने ३ जुलै तारीख आदेशकामी नेमलेली आहे. या केसमध्ये निवृत्ती महाराज यांच्या विरुद्ध अद्याप गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश झालेला नसतांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

असे असतांना नाहक त्यांची बदनामी करण्यासाठी इंदुरीकर महाराजांवरती गुन्हा दाखल झाला, अशा खोट्या बातम्या तथाकथित काही समाजसेवकांनी दिल्या.

त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली. सरकारतर्फे २३ जून रोजी कलम २८ प्रमाणे फिर्याद दाखल झाली आहे. पहिली सुनावणी २४ तारखेला होती.

त्या कामकाजाची २६ तारीख दिली. न्यायालय गुन्हा दाखल करायचा की नाही हा आदेश देण्याची शक्यता होती. मात्र तसे न होता न्यायालयाने ३ जुलै तारीख दिली.

असे असतानाही निवृत्ती महाराजांवर गुन्हा दाखल झाला, सत्याचा विजय झाला अशा खोट्या बातम्या माध्यमाना दिल्या. कोर्टाने अद्याप आदेश दिला नसतानाही महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अशा तथाकथित समाजसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, यासाठी निवेदन दिले, असे अ‍ॅड. गोरक्ष कापकर यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24