पथकाने छापे टाकले, मात्र बाळ बोठे सापडेना !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्या प्रकरणात माध्यमे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्यांनी जबाबदारीने वागावे.

मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कोर्टाला हस्तक्षेप करून आदेश द्यावा लागेल, अशी तंबी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी शुक्रवारी दिली.

मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होती. पोलिसांकडून कागदपत्रे उशिरा आल्याने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

सोबत पोलिसांनी बोठेला स्वत: हजर करण्यात यावे, असा अर्जही केला आहे. हे कामकाज सुरू असताना न्यायाधीशांचे लक्ष कोर्टातील गर्दीकडे गेले. त्या अनुषंगाने त्यांनी तंबी दिली.

नेटकऱ्यांनी जपून लिहावे. मीडिया ट्रायल खपवून घेणार नाहीत, असे त्यांनी बजावले. पोलिसांची पाच पथके बोठेचा शोध घेत आहेत. गुरुवारी दोन ठिकाणी पथकाने छापे टाकले, मात्र काही आढळले नाही.

पोलिसांनी जरे, तसेच भिंगारदिवे व बोठेच्या घराची झाडाझडती घेतली आहे. बोठे याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. झडतीत महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत, असेही ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24