घराचा कडीकोंडा तोंडत चोरटयांनी घरातील माल केला लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील साकूर येथील किशोर बनसोडे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाट्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना शनिवारी घडली आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, साकूर परिसरातील वनवेनगर येथे किशोर बनसोडे हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे.

त्यांनी बनसोडे वस्ती येथे नूतन घर बांधले आहे. त्यामुळे बनसोडे व त्यांची पत्नी यांनी घरातील सर्व साहित्य आटोपून सोन्याचे सर्व दागिने व पैसै कपाटात ठेवले होते. आणि ते वास्तूशांती करण्यासाठी बनसोडे वस्ती येथे गेले होते.

दरम्यान, शनिवारी मध्यरात्री घरात कुणी नसल्याचा फायदा उठवत अज्ञातचोरट्यांनी कडीकोयंडा तोडत आतमध्ये प्रवेश केला. कपाट उचकून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला.

पहाटे दोन वाजेच्या सुमारास आजूबाजूच्या नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी तातडीने घटनेची माहिती बनसोडे यांना दिली.

दरम्यान, घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24