अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी तथा दैनिक सकाळचा माजी संपादक पत्रकार बाळ बोठे याच्यावर एका महिण्यातील तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हाही एका महिलेच्याच फिर्यादीवरुन दाखल केला आहे.
रेखा जरे हत्याकांड प्रकरणात बाळ बोठे मुख्य आरोपी आहे.या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात एका महिलेनेही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
व काल रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात बाळ बोठेवर खंडणीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने याबाबत फिर्याद दिली असुन बाळ बोठे ने फिर्यादीस एका प्रकरणात तब्बल १० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार नोंदविली आहे.
दरम्यान रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार असणारा बाळ बोठे अद्याप फरार असुन पोलिस त्याच्या मागावर आहेत.मात्र तो दरवेळी पोलिसांना चकवा देत पळुन जाण्यात यशस्वी ठरतोय. या एकाच महिण्यात बाळ बोठेवर तब्बल तिन गुन्हे दाखल झाल्याने बाळ बोठे चांगलाच अडचणीत सापडला आहे.