विजेच्या शॉक लागून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात राहणारी तरूणी मनिषा सुभाष देवकर, (वय- २९) हिला विजेचा शॉक बसल्याने तिला नगर येथील सिव्हील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

तेथील डॉक्टरांनी तपासले असता मनिषा हिचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झालेला होता. सिव्हिल हॉस्पीटलचे डॉ.खटके यांनी तशी खबर पोलीसात दिली.

पोलीसांनी अकसमात मृत्यूची नोंद केली असून मनिषा देवकर या तरूणीचा कसा शॉक बसून मृत्यू झाला याचा पुढील तपास हेकॉ बऱ्हाटे हे करीत आहेत

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24