अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील धरणे, नद्या, ओढे, बंधारे हे ओव्हरफ्लो झाले आहे. पाण्याची मुबलकता असल्याने शहरातील काही ठिकाणी पाणी विस्कळीत झाल्याच्या घटना घडत आहे.
नुकतीच भिंगार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. आठवड्यातून ४-५ दिवसानंतर पाणी सोडले जाते.
भिंगार शहराला गेली ५० वर्षांपासून आर्मीची संस्था एमईएस या संस्थेमार्फत पाणीपुरवठा होत आहे. व्यावसायिक दराने पाणीपट्टी छावणी परिषद आकारणी करीत आहे.
यासाठी अहमदनगर महापालिका व छावणी परिषद यांच्यामध्ये पाणीपुरवठ्याचा करार करून महापालिकेने भिंगार शहराला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भिंगार शहर भाजपतर्फे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे केली.
भाजप नगरसेविका शुभांगी साठे, भाजप शहराध्यक्ष वसंत राठोड, शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे, भिंगार उपाध्यक्ष गणेश साठे, युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर कटोरे यांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved