नगर :- शहरात जाधव मळा चौक बालिकाश्रम रोड येथे सनी याचे रुबाब कपड्याच्या दुकानाजवळून भाजीपाला घेवून पायी चाललेल्या सौ. जाधव हि महिला घरी जात असताना काही आरोपी गाड्यांची तोडफोड करत होते. यावेळी सौ. जाधव म्हणाल्या की, तुम्ही असे का करता? असे करू नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने सदर महिलेस लाकडी दांड्याने व कोयत्याने बेदम मारहाण करून गाड्यांची तोडफोड करुन नुकसान केले. शिवीगाळ करत दमदाटी केली.
याप्रकरणी महिलेचे नातेवाईक आदिनाथ वनाजी जाधव, रा. जाधव मळा, लक्ष्मीमाता मंदिराशेजारी, बालिकाश्रम रोड, नगर यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी आकाश पांडुरंग जाधव, भरत पांडुरंग जाधव, योगेश विठ्ठल जाधव, विठ्ठल रंगनाथ जाधव व भरत जाधवची आई, सर्व रा. जाधव मळा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हे.काँ.गाजरे हे पुढील तपास करीत आहेत.