अहमदनगर : नगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी येथील यशवंत कॉलनीत क्षुल्लक कारणावरुन तीन महिलांनी एका महिलेस शिवीगाळ, दमदाटी करुन लोखंडी साखळी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घडली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ममता दीपक पातारे (रा.यशवंत कॉलनी, दरेवाडी) या दुधाची पिशवी आणायला जात असताना जया देविदास पातारे व तिच्या दोन मुली महिमा व श्रद्धा (सर्व रा.यशवंत कॉलनी, दरेवाडी)
यांनी आडवून ‘तू येथे, गोधडी का वाळत घातलीस?’ असे म्हणून शिवीगाळ करुन लोखंडी साखळीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाणीत ममता पातारे या जखमी झाल्या. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी ममता पातारे यांच्या फिर्यादीवरुन मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.