अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-अहमदनगर शहरातुन चार मुलांसह गायब झालेली महिला व मुले अखेर पुण्यात सापडले आहेत, ह्या खळबळच उडाली होती.
शहरातील सावेडीच्या प्रेमदान हाडकोमध्ये एक आई आपल्या चार मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अहमदनगरच्या सावेडीतील एका दाम्पत्याचे चार दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून भांडण झाले.
त्यानंतर महिला आपल्या मुलीसह घरातून गायब झाली होती. पतीने तिचा जवळच्या नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळली नाही.
त्यानंतर तिने, आपण आत्महत्या करणार असल्याचा संदेश पतीला पाठविला. त्यामुळे पती घाबरला. त्याने तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली.
तोफखाना पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, ती पुणे जिल्ह्यात असल्याची खात्री झाली. त्यानुसार तिचा शोध घेण्यात आला. अखेर कुटुंबीयांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडला आहे.
या प्रकरणी ळासाहेब गणपत पानसरे (वय ४५) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती बाळासाहेब पानसरे यांची पत्नी पल्लवी पानसरे (वय ३६), मुलगी वैष्णवी पानसरे (वय १८),
वैभवी पानसरे (वय १८), सोनल पानसरे (वय १७) असे बेपत्ता झालेल्यांची नावे होती. ३ फेब्रुवारीला सकाळी बाळासाहेब यांचे पत्नी पल्लवी सोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते.