घराजवळ काम करत असलेल्या एका महिलेचा या चुकीमुळे झाला मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत : तालुक्यातील शिंदा येथे वीज वितरणची उच्च दाबाची वाहिनी तुटल्याने आपल्या घराजवळ काम करत असलेल्या एका महिलेस आपला जीव गमवावा लागला.

शिंदा ते भोसे जाणारी उच्च दाबाची वीजवाहिनी शुक्रवारी सकाळी १० वाजता अचानक तुटून खाली पडल्याने सुरेखा अनिल ननवरे वय ४२ ही गंभीर भाजून जागीच मृत्यू पडली. याशिवाय तिच्या जवळील कुत्रेही मरण पावले.

१५ केव्हीची उच्चदाब वीज वाहक तार या महिलेच्या घराजवळून गेलेली आहे. सकाळी ती अचानक तुटली, यावेळी घरात फक्त तिची मुलगी होती तिने आरडाओरडा करून आसपासच्या नागरिकांना जमा केले.

तो पर्यंत या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला होता. या महिलेच्या मागे पती एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेबाबत पोलीस पाटील घालमे यांनी कर्जत पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर सहा पोलीस निरीक्षक सुरेश माने, वीज वितरणचे अभियंता घुले, यांनी भेट दिली.

याबाबत कर्जत पोलीस स्टेशनला अकस्मात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून यावेळी वीज वितरणकडून २० हजार रुपयांची तातडीची मदत या महिलेचा पती अनिल ननवरे यांना देण्यात आली असून अधिकची ३ लाख ८० हजार रुपयांची मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करू अशी माहिती वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पो. ना.पांडुरंग वीर हे करत आहेत.

या घटनेचा योग्य तो तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिंदा ग्रामस्थांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24