संगमनेर : संगमनेर शहरात अकोले बायपास रोड परिसरात असलेल्या एका अभ्यासिकेत एक तरुण विद्यार्थिनी अभ्यासाला यायची या ठिकाणी आरोपी सूर्यकांत पोपट कडलग, रा. रायतेवाडी, ता. संगमनेर हा असायचा.
अभ्यासिकेत तरुणीबरोबर ओळख झाली व ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. या मैत्रीचा गैरअर्थ काढून आरोपी सूर्यकांत पोपट कडलग याने सदर विद्यार्थिनीचा हात धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला. वेळोवेळी लग्नाचा तगादा लावला.
अभ्यास करुन सदर पिडीत तरुण विद्यार्थिनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. आरोपी सूर्यकांत पोपट कडलग याने सदर तरुणीला तू मला दर महिन्याला ५ हजार रुपये दे, नाहीतर मी तुझी बदनामी करीन, अशी धमकी दिली व शिवीगाळ केली.
वरीलप्रमाणे तरुणीने काल संगमनेर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपीसूर्यकांत पोपटाव कडलग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी कडलगला पोलिसांनी अटक केली आहे.