अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- अनेकांना टिकटॉकवर व्हिडीओ शेअर करण्याची सवय असते. परंतु टिकटॉक आता काही व्हिडिओंवर कारवाई करणार आहे.
शारीरिक हिंसा, शारीरिक छळ करण्याला प्रोत्साहन देणे, कोणत्याही विशिष्ट समुदायाचा अपमान करने, कोणाचीही वैयक्तीक माहीती TikTokच्या माध्यमातून प्रदर्शित केल्यास कंपनी कडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपून TikTokवर भयानक व्हिडिओ येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
त्यामुळे कपंनीने TikTok प्रेमींसाठी काही अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. युझर्सला व्हिडिओ साकारताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी हे देखील सांगितले आहे.
व्हिडिओ साकारताना कोणत्याही प्रकारच्या अपशब्दा चा वापर न करण्याची सूचना TikTokकडून देण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com