अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नगर जिल्ह्याला ४ मंत्री आहेत. पण तरीही जिल्ह्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पाथर्डी तालुक्यात बिबट्याने हल्ला केलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निशाणा त्यांनी साधला आहे. ‘जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत व पालकमंत्री कोल्हापूरचे आहेत. परंतु जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा न्याय सरकारकडून मिळत नाही. कारण बिबट्यासारखी घटना घडली, तेव्हा एकही मंत्री भेट देण्यास गेला नाही.
पाथर्डी तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत तीन बालकांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. मात्र या नरभक्षक बिबट्याला अद्यापपर्यंत पकडण्यात यश आले नाही. याबाबत आज बोलताना माजी मंत्री कर्डिले यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ,
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ‘पाथर्डी तालुक्यात तीन ठिकाणी बिबट्याने बालकावर हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली,’ असे सांगत कर्डिले पुढे म्हणाले,
‘मढी, केळवंडी व शिरापूर या तीन गावातून लहान मुलाला बिबट्याने उचलून नेले. मढी येथील घटना घडल्यानंतर लक्ष दिले असते, तर पुढचा प्रकार हा टाळता आला असता असेही कर्डीले म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved