अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवलं ‘असे’ आहेत नियम !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-राज्यभरात १ ऑगस्टपासून मिशन बिगिन अगेनच्या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल करण्याचा सरकारनं निर्णय घेतला असून अहमदनगर मध्येही काय सुरु रहाणार आणि बंद याबाबत माहिती आपण या  बातमीमध्ये जाणून घेणार आहोत.
  • अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास फोजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४  अन्वये काही बाबींना मनाई करण्यात अली आहे.
  • यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्र येण्यास मनाई राहील. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्या हवाई प्रवासी वाहतूक व्यतिरिक्त सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.
  • स्वतंत्र आदेश आणि एसओपीव्दारे अनुमती दिलेल्या व्यतिरिक्त रेल्वे प्रवासी वाहतूक आणि देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील. सिनेमा हॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्सम ठिकाणे बंद राहतील.
  • सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आदींसाठी सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास मनाई राहील. सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता डतर कामांसाठी व्यक्‍तीच्या हालचारली तसेच फिरण्यावर सायंकाळी ७ ते सकाळी ५ या कालावधीत निर्बंध राहील.
  • ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्‍ती, गर्भवती महिला आणि १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील. सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील. जलतरण तलाव चालविण्यास परवानगी असणार नाही.
‘हे’ सुरु राहणार!
  • अत्यावश्यक दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली होती, ती सर्व दुकाने तशीच सुरु राहतील. शारिरीक अंतर ठेवून आणि स्वच्छतेच्या उपाययोजना करुन प्रती बस, कमाल मर्यादा ५० % क्षमतेसह जिल्ह्यांतर्गत बस सेवा चालविण्यास परवानगी असेल.
  • आंतरजिल्हा वाहतुकीचे, नियमितपणे विनियमन (ई-पास व्दारे) करण्यात येईल. सर्व बिगर-अत्यावश्यक बाजारपेठा / दुकाने सकाळी ९ . ०० सायं. ५ . ०० वाजेपर्यंत खुली राहतील. मॉल्स आणि बाजारसंकूले ( थिएटर वगळून) दि. ०५ ऑगस्ट २०२० पासून सकाळी  ९ . ०० ते सायं. ५ . ०० या कालावधीत खुले राहतील.
  • मॉलमधील रेस्टॉरंट्स आणि फूड कोर्टसचे किचन यांना स्थानिक प्राधिकरणाचे एसओपीनुसार होम डिलिव्हरीची परवानगी असेल.
  • विवाहासंबंधीत शासनाने परवानगी दिल्याप्रमाणे मोकळ्या जागा, लॉन, बिगर वातानुकूलित सभागृह यामध्ये विवाहासंबंधित समारंभाना परवानगी देण्यात येईल. निर्बंधासह मैदानी शारीरिक कसरती करण्यास परवानगी असेल.
  • वर्तमानपत्राचे मुद्रण आणि त्यांचे वितरण (घरपोच सेवेसह) परवानगी असेल. ई मजकुराचा विकास, उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे, यासह बिगर शैक्षणिक कामे यासाठी शैक्षणिक परिसंस्थांची (विदयापिठ/ महाविद्यालय / शाळा) कार्यालये / कर्मचारी वर्ग, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना मुभा असेल.
  • शासनाचे परवानगी दिल्याप्रमाणे, शर्तीसह केस कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर उघडण्यास परवानगी असेल. गोल्फ कोर्स, आउटडोअर फायरिंग रेज, जिम्नॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा बिगर समूह बाहय क्रिडा प्रकारांस दि. ०५ ऑगस्ट २०२० पासून शारीरिक अंतर ठेवून आणि स्वच्छतेच्या उपाय योजनांसह परवानगी असेल.
  • सर्व सार्वजनिक आणि खाजगी परिवहन व्यवस्था नियमितपणे पुढील प्रमाणे प्रवासी व्यवस्थापनाचे पालन करतील. – मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.
प्रवासासाठी नियम असे आहेत
  • दुचाकी – १ + १ हेल्मेट आणि मास्कसह.
  • तीन चाकी – फक्त आवश्यक १ + २
  • चार चाकी – फक्त आवश्यक १ + ३
  • कोणत्याही विशेष / सर्वसाधारण आदेशाव्दारे मुभा दिलेले आणि परवानगी दिलेले इतर कोणतेही कार्य व्यवस्थापनाचे दृष्टीने खालील राष्ट्रीय अहमदनगर जिल्हामध्ये सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी कोविड १९ चे व्यवस्थापन बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवास करताना, चेहरा झाकणे अनिवार्य आहे.
  • सामाजिक अंतर राखणे – सार्वजनिक ठिकाणी, सर्व व्यक्‍तींनी एकमेकांत कमीत कमी ६ फूट राखले पाहिजे. दुकानदार, ग्राहकांमध्ये शारीरिक अंतर राखण्याची सुनिश्‍चिती करतील आणि एकावेळी पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना मुभा देणार नाहीत. एकत्र जमणे, मोठी सार्वजनिक संमेलने / भव्य सभा यांस नियमितपणे मनाई असेल.
  • विवाहासंबंधी कार्यक्रमात पाहुण्यांची संख्या ५० पेक्षा अधिक असणार नाही. अंत्यसंस्कार / अंत्यविधी यासंबंधीतील कार्यक्रमात एकत्र जमणे- व्यक्तींची संख्या २० पेक्षा अधिक असणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे संबंधित स्थानिक प्राधिकरणांव्दारे, त्यांचे कायदे, नियम, विनियम यानुसार विहित करण्यात येईल, अशा दंडाच्या शिक्षेस पात्र असेल.
  • सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू, इत्यादींच्या सेवनास मनाई आहे. कामाच्या ठिकाणांसाठी खालील अतिरिक्त मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. घरातून काम करणे -शक्य असेल तेथवर, घरुन काम करण्याची पध्दत अनुसरण्यात यावी. कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक आणि वाणिज्यिक आस्थापना यामध्ये कामाच्या / कामकाजाच्या वेळांचे सुनियोजितपणे आखणी करावी.
  • परिक्षण (स्क्रीनिंग) आणि स्वास्थ्य औष्णिक परीक्षण (थर्मल स्कॅनिंग), हात स्वच्छ करण्याचे द्रव्य (हॅडवॉश) आणि निर्जंतुकीकरण द्रव्य (सॅनिटायझर) हे सर्व प्रवेशव्दायजवळ आणि निर्गमन व्दाराजवळ आणि सामाईक क्षेत्रांत पुरविण्यात येईल.
  • वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) – संपूर्ण कामाच्या ठिकाणाचे, सामाईक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणा-या सर्व जागा यांचे, उदाहरणार्थ दरवाजांच्या मुठी (डोअर हॅण्डल) इत्यादींचे कामाच्या पाळ्यांमध्ये वारंवार
  • निर्जतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्याची सुनिश्‍चिती करण्यात येईल.
  • सामाजिक अंतर राखणे
  • कामाच्या ठिकाणांच्या सर्व प्रभारी व्यक्‍ती, कामगारांमध्ये पुरेसे अंतर राखणे, कामाच्या पाळ्यांदरम्यान पर्याप्त अंतर ठेवणे, दुपारच्या जेवणाच्या वेळेत पुरेसे अंतर राखणे, आदींद्वारे सामाजिक अंतर राखण्याची सुनिश्‍चिती करतील. कोणतीही व्यक्‍ती / संस्था / संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशिर कारवाईस आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील.
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24