‘ह्या’ आहेत सर्वाधिक स्वस्त व जबरदस्त मायलेज देणाऱ्या ऑटोमॅटिक कार; जाणून घ्या..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- पूर्वीपेक्षा आता जास्त लोक ऑटोमेटिक गीअर तंत्रज्ञाना असणाऱ्या कार विकत घेत आहेत. खरं तर, काही वर्षांपूर्वीपर्यंत कारमध्ये ऑटोमेटिक ट्रान्समिशन ही एक लक्झरी गोष्ट असायची.

परंतु तंत्रज्ञानात झालेल्या वाढीमुळे आपल्याकडे आता एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारमध्ये ऑटोमेटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. यामुळे ऑटोमेटिक कारची मागणी वाढली आहे.

विशेषत: भारतातील रहदारी पाहता लोक या मोटारी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. आपल्यालाही ऑटोमेटिक कार खरेदी करायची असेल तर आम्ही आपल्याला काही स्वस्त मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत.

१) मारुती ऑल्टो :- मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. मारुती कडे एकापेक्षा एक आलिशान पेट्रोल, सीएनजी आणि ऑटोमेटिक कार आहेत. त्याची सर्वात स्वस्त कार ऑल्टो आहे, ज्याची प्रारंभिक किंमत अंदाजे 3 लाख रुपये आहे. मारुतीची ही कार ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्येही उपलब्ध आहे. ऑल्टोचे ऑटोमेटिक गिअरबॉक्स व्हेरिएंट आहे ज्याची किंमत 4.43 लाख रुपये आहे. या कारमध्ये 998 सीसी इंजिन आहे, ज्यामध्ये 68 पीएस उर्जासह 90 एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

२) मारुती सुझुकी सेलेरिओ :- मारुती कंपनीच्या कारना भारतात बरीच पसंती आहे. आता या कंपनीच्या अनेक कमी किंमतीच्या कारमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक फिचर मिळतील. ज्यामध्ये सध्या मारुती सुझुकी सेलेरिओ या कारला बरीच मागणी आहे. सेलेरिओमध्ये 998 सीसीचे 3 सिलेंडर असणारं इंजिन आहे. जे, 50 केडब्ल्यूची पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. याची शोरुममधील किंमत 5,13,138 रुपये आहे.

३) रेनॉल्ट क्विड :- रेनॉल्ट क्विडने फारच कमी कालावधीत भारतात आपले स्थान बनवले आहे. त्याचे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स व्हेरिएंटची किंमत 4.54 लाख रुपये आहे. या कारमध्ये तुम्हाला 999 सीसीचे ट्रिपल सिलिंडर इंजिन मिळेल. रेनॉल्ट क्विडच्या या शक्तिशाली इंजिनची जास्तीत जास्त 67 बीपीपी क्षमतेसह 91 एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. कार एक ईजी-आर एएएमटी 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. यासह मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्यायही देण्यात आला आहे.

४) ह्युंदाई सँट्रो :- स्वस्त ऑटोमॅटिक कारमध्ये येणारं आणखी एक नाव म्हणजे ह्युंडाई सँट्रो. बऱ्याच काळापासून ही कार लोकप्रिय आहे. या कारला 1.1 लीटरचं 3 सिलेंडर असणारं इंजिन देण्यात आलं आहे. जे 69 पीएस पॉवर आणि 101 चं टॉर्क जनरेट करतं. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणाऱ्या या कारची शोरूममधील किंमत 525,990 इतकी आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24