अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-बजाज ऑटो, हुस्कवर्णा आणि केटीएम बाईकच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत.
बजाजने पल्सर 150 , पल्सर 180 आणि पल्सर 220Fच्या किंमती वाढवल्या आहेत, तर हुस्कवर्णाच्या स्वार्टपिलेन 250 आणि व्हिटपिलेन 250 बाईक महागड्या झाल्या आहेत.
बजाजचे तिन्ही मोटरसायकल मॉडेल्स 1,498 रुपयांनी महाग झाले आहेत. त्याचबरोबर हुस्कवर्नाच्या दोन्ही मॉडेल्सच्या किंमतींमध्ये 1,790 रुपयांनी वाढ झाली आहे.
1. 1,498 रुपयांनी महाग झाले पल्सरचे तीन मॉडेल्स :-
- – बजाज पल्सर 150 चे तीन व्हेरिएंट निऑन, स्टँडर्ड आणि ड्युअल डिस्क या तीन प्रकारांमध्ये विकली जाते. एंट्री-लेव्हल नियोनची एक्स-शोरूम दिल्लीची किंमत आता वाढून 92,627 रुपयांवर गेली आहे, जी आधीच्या 91,130 रुपयांवरून वाढली आहे.
- – त्याचप्रमाणे पल्सर 150च्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 98,086 रुपये वरुन, 99,584 रुपयांवर गेली आहे आणि ड्युअल डिस्क ट्रिम व्हेरिएंटची एक्स-शोरूम दिल्ली किंमत आता 1,03,482 रुपयांवे गेली आहे, जी आधी 1,03,482 रुपयांत उपलब्ध होती.
- – पल्सर 180F बद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 1,13,018 रुपये झाली आहे, जी आधी 1,11,520 रुपये होती. त्याच वेळी, पल्सर 220 एफ आता 1,23,245 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, पूर्वी या मॉडेलची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 1,21,747 रुपये होती.
2. 1,790 रुपयांपर्यंत हुस्कवर्नाचे दोन्ही मॉडेल महाग झाले :-
- – हुस्कवर्णा स्वार्टपिलेन 250 ची किंमत 1,790 रुपयांनी वाढून 1,86,750 रुपये झाली आहे. हे पूर्वी 1,84,960 रुपयांमध्ये खरेदी करता येत होते. त्याचबरोबर, हुस्कवर्ना व्हिटपीलेन 250 हे देखील 1,790 रुपयांनी महाग झाले असून ते 1,86,750 रुपये झाले आहेत. तथापि, दोन्ही बाईक्समध्ये विजुअली किंवा मॅकेनिकली कोणताही बदल नाही. हुस्कवर्णाच्या या दोन्ही मॉडेल्समध्ये 249 सीसी, सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. त्यासह 6 स्पीड ट्रान्समिशन सिस्टम देण्यात आला आहे. इंधन इंजेक्टेड इंजिन 30 हॉर्स पावर आणि 24 एनएम टॉर्क जनरेट करते.
3. केटीएम बाईक 8,517 रुपयांनी महाग झाली :-
- – केटीएम ने 200 ड्यूक, 250 ड्यूक आणि 390 ड्यूक बाईक मॉडेल्स व्यतिरिक्त केटीएमने आरसी 125 आणि आरसी 390 बाइक्सच्या किंमतीही वाढवल्या आहेत.
- – केटीएम 200 ड्यूक 1,923 रुपयांनी महाग झाली असून आता ती 1,78,960 रुपयांना मिळेल. त्याची जुनी किंमत 1,77,037 रुपये होती.
- – केटीएम 250 ड्यूकची किंमत 4,738 रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर दुचाकीची एक्स-शोरूम किंमत आता 2,14,210 रुपयांवर गेली आहे, जी आधी 2,09,472 रुपये होती.