अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.
त्यातच वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच कोल्हार येथे भरवस्तीत बंद घराचा दरवाजा तोडून चोरी झाली. दहा तोळे सोने-चांदी व २५ हजार रोख रक्कम असा ऐवज पाच चोरट्यांनी लंपास केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पाटीलबानगरमध्ये राहणारे निवृत्त लष्करी अधिकारी रवींद्र दांडगे यांच्या भाडेकरूंच्या घरात ही घटना घडली. बनवारी ओमप्रकाश जागींर (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. २५ नोव्हेंबरला जागींर बाहेरगावी गेले होते.
तारेचे कंपाऊंड तोडून चोरट्यांनी आवारात प्रवेश केला. दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी हॉलमध्ये ठेवलेल्या बॅगेमधील ऐवज लांबवला. एक चोर बाहेर लक्ष ठेवून होता, बाकीच्या चार जणांनी डाव साधत चोरी केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसते. चोरटयांनी दहा तोळे सोने व २५ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली.
भरवस्तीत चोरी झाल्याने दिवसभर हा चर्चेचा विषय झाला होता. शिर्डीचे डीवायएसपी संजय सातव, लोणीचे सपोनि समाधान पाटील व पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved