कोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर येथील एका रूग्णास उपचारासाठी ग्रामस्थांनी अवघ्या दोन तासात वीस हजार रुपये जमा करून पुन्हा एकदा संकट समयी मदतीचा हात देण्यास आम्ही तयार आहोत,

हे सिद्ध केले. संबंधितास श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तपासणीअंती पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सहा इंजेक्शनसाठी सुमारे बावीस हजार रुपये तातडीने जवळ नसल्याने व परिस्थिती

अडचणीची असल्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने वर्गणी करत मदतीचा हात दिला. यामध्ये प्रामुख्याने गावचे सरपंच यासीन शेख, चेअरमन गणेश बोबडे, मोबीन शेख, बाळासाहेब धोत्रे,

भाऊसाहेब ओहोळ, मधुकर सकट, भाऊसाहेब वाघ, मनोहर शिंदे, एकनाथ पवार, विठ्ठल कोळपे, तुळशीदास बोबडे, चेअरमन काका बोबडे, अनिल ओहोळ, उत्तम शिंदे, सुखदेव ओव्हळ,

जयसिंग धोत्रे, मिलिंद पवार, जयवंत पवार, सुरेश आडागळे, मच्छद्रिं सकट आदींनी मदत केली. सध्या जगभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण संकटात आहे.

प्रत्येकाने स्वत: सावध असायला हवे. स्वत:ची काळजी स्वत: घ्यायला पाहिजे. खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही.

ग्रामीण भागात आधीच मोल मजुरीचे दर कमी झालेले आहेत .त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने सामान्य कुटुंबाची वाताहत होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24