‘त्यांनी’ खुर्चीला चिटकून बसण्यापेक्षा राजीनामा द्यावा; खासदार विखे यांचे तनपुरे यांच्यावर टीकास्त्र

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- राहुरीतील मंत्री असताना शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते हे दुर्दैव आहे. खुर्चीला चिटकून बसण्यापेक्षा राजीनामा द्यावा. आम्ही मंत्री असतो तर शेतकऱ्यासाठी राजीनामा दिला असता.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांबरोबर अन्यायाचे धोरण घेतले आहे. ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीत गंभीर तक्रार आहेत. अशी टीका खासदार डॉ.सुजय विखे यांनी उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर वीज प्रश्नी केली.

नुकताच राहुरी येथे कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा बँकेचे नूतन संचालक शिवाजी कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार सुजय विखे बोलत होते. खा.विखे म्हणाले की, लोकसभेत वेगळा आणि विधानसभेत वेगळा निकाल लागला गेल्याने निश्चित कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

परंतु आम्ही भविष्यात एकसंघ राहून पुढील निवडणुका लढविणार आहोत. अहमदनगर जिल्हा बँकेची नगर तालुक्यात निवडणूक झाली अन् शिवाजी कर्डिले हेच या निवडणुकीत खरे हिरो ठरले आहेत. माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले, नगर जिल्ह्यात सर्व नातेवाईक कार्यकर्त्यांना आता तुम्ही समजून सांगण्याची खरी गरज आहे.

माझ्याशी कोणाचे पटत नसेल तर याचा अर्थ विरोधात जाणे योग्य नाही. हा प्रश्न फक्त राहुरीकर यांचाच नाही तर सर्व जिल्ह्याचा प्रश्न आहे. आपण मागच्या दाराने प्रवेश करणार नाहीतर राहुरी विधानसभा मतदार संघात पुन्हा निवडणूक लढवणार आहे. बंद पडलेला डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरळीत करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेहमीच मदत केली. यापुढेही सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24