मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- राहुरी येथील महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली. १६ ऑगष्टला मध्यरात्री जंगमगल्लीतील मंदिरात ही घटना घडली.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत या मंदिराचे बांधकाम झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभाऱ्याला कुलूप लावून दर्शन व्यवस्था बाहेरून करण्यात आली आहे.

सोमवारी मध्यरात्री दानपेटीची चोरी झाल्याचे लक्षात आल्याने पुजाऱ्याने पोलिसात खबर दिली. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी हवालदार शिवाजी खरात, पोलिस नाईक प्रवीण खंडागळे, दिगंबर सोनटक्के या पथकासह घटनास्थळी भेट दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24