अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरस चा तिसरा पेशंट आढलला आहे.
धक्कादायक म्हणजे हा रुग्ण विदेशात गेलेला नसुन त्याला या व्हायरसची बाधा झाली आहे.
हा रुग्ण नगर शहरातील असुन केवळ संसर्गातुन त्याला ह्या व्हायरसची लागन झाली आहे.
रविवारी सर्दी आणि खोकला येत असल्याने तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता.
पुणे येथील प्रयोगशाळेतुन दिलेल्या अहवालानुसार तो पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान आतापर्यंत नगर मध्ये २०८ संशयित रुग्ण आढळले असुन जवळपास १९७ रुग्णाना घरी पाठवण्यात आले आहे.