पशुपालन व्यवसायासाठी ‘ही’ बँक खेळते भांडवल उपलब्ध करून देणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याला सहकार क्षेत्राचा मोठा इतिहास राहिलेला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार क्षेत्राने सावरले आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेचा मोठा वाटा आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

आता शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने 2020-21 हंगामाकरिता पशुपालन, पक्षीपालन, मत्स्य व्यवसाय, शेळी मेंढी पालन यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याला मंजुरी दिली आहे.

पशुपालन व्यवसायासाठी जिल्हा बँक शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे दहा गायींकरिता दीड लाख रुपयांचे वैयक्तीक कर्ज शेतकर्‍यांना अल्प व्याजदरात देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतला असल्याची माहिती संचालक करण ससाणे यांनी दिली.

यासाठी पशुपालन संबंधी केंद्र शासनाने तालुका दूध उत्पादक संघाच्या सभासदांना रुपे किसान क्रेडिट कार्ड व खेळते भांडवल कर्जवाटप संबंधी 1 जून ते 31 जुलै दरम्यान अभियान राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाली असून त्याबाबत सहकारी संघांना विभागीय उपनिबंधक यांनी अभियान राबविण्याचे कळविले आहे.

दूध उत्पादक सभासदांचे कर्ज तालुका दूध उत्पादक संघाकडून गोळा केले जाणार आहे. दूध उत्पादक सेवा संस्थेच्या सभासद असणे गरजेचे आहे. खेळते भांडवल कर्ज वाटप कार्यक्रम 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत राहील. तसेच वसुलाची अंतिम मुदत 31 मार्च राहील. कर्जाचा व्याजदर हा 7 टक्के राहणार असल्याचे ससाणे यांनी सांगितले आहे.

करोनासारख्या महाभयंकर महामारीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न जिल्हा बँकेने केला आहे. दूध उत्त्पादक सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी दिलेल्या केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24