‘ह्या’ कारणामुळे केली ‘त्या’ कोरोना रुग्णाने आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- कोरोना रुग्णाने खासगी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास सावेडी रस्त्यावरील गुलमोहोर रस्त्यावरील सुरभी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. 

आजाराच्या भीतीपोटीच या रुग्णाने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज तोफखाना पोलिसांनी व्यक्त केला. पाथर्डी येथील या ३२ वर्षीय रुग्णावर दहा दिवसांपासून उपचार सुरू होते.

शिरूर येथील खासगी हॉस्पिटलमधून त्याला सावेडीतील सुरभी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनातून आपण आता बरे होत नाही,

या भीतीतून त्याने सोमवारी रुग्णालयातच फाशी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. त्यानंतर त्याने जनरल वॉर्डमधील सर्व रुग्ण झोपल्यानंतर पहाटे ३ वाजून १३ मिनिटांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु सकाळी पावणेअकरा वाजता त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24