‘ह्या’ शेतकर्‍याने केली थायलंडच्या ‘त्या’ चारा पिकाची लागवड; कमावले लाखो

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. अनेक शेतकरी असे आहेत कि ते वर्षभर शेती कसतात आणि आपला चरितार्थ चालवतात.

परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धास्तावलेल्या शेतकर्‍यांचे निसर्गाच्या अवकृपेने आर्थिक गणित कोलमडले आहे. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत नेवासे तालुक्यातील फत्तेपूर येथील सोमेश्वर लवांडे या शेतकर्‍याने वेगळा प्रयोग केला.

सातत्याने तीन वर्ष परिश्रम घेत आपल्या शेतात थायलंडमध्ये विकसित झालेला ‘फोर जी बुलेट सुपर नेपियर’ या चारा पिकाची लागवड करून लाखो रुपयांचा नफा कमविला आहे.

सोमेश्वर लवांडे या अल्पभूधारक शेतकर्‍याने शेती व्यवसायात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध सुरु केला.

नवनवीन पिकांचा शोध घेताना याचवेळी त्याला थायलंडमधील विकसित 4 जी बुलेट सुपर नेपियर या चारा पिकांची माहिती मिळाली. हेच पीक आपल्याकडील पारंपरिक गिनी आणि इतर चारा पिकांना फाटा देईल,

हे लक्षात घेत तीन वर्षांपासून केलेल्या प्रयोगानंतर यश मिळवले. लॉकडाऊनमध्ये तब्बल 15 लाखांची उलाढाल चारा उद्योगातून झाली असून चार लाखांचा निव्वळ नफा केवळ फक्त 15 गुंठ्यात मिळवला.

पिकाची वैशिष्ट्ये- पिकाची वाढ- 18 ते 20 फूट, सर्वात जास्त प्रथिने – (15 ते 18%), मुरघास साठी उपयुक्त, एका वर्षाला 3 कापण्या, 5 ते 6 वर्षे चालणारा जलद वाढ होणारा वाण.

अशी करा लागवड – या चारा पिकाची लागवड करण्यासाठी एकरी 12 हजार डोळे लागतात. सरी पद्धतीने 3 फूट बाय 1 फूट अंतरावर एक डोळा पद्धतीने लागवड करावी.एका डोळ्यापासून 40 ते 50 फुटवे निघतात. 2.5 ते 3 महिन्यात चार्‍याची पहिली कापणी होते.

उत्पन्न – दर 3 महिन्यांनी पुढील कापण्या होऊन एका वर्षात 3 कापण्यां मध्ये एक एकरातून किमान 90 टन हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो. चारा म्हणून विक्री केली तरी सुद्धा एकरी 2 लाखाचे उत्पन्न मिळते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24