अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून अनेक नेते पदाधिकार्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना कोरोनाची लागण झाली
असून ते सध्या श्रीरामपुरातील संतलुक येथील कोरोना उपचार केंद्रात उपचार घेत आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी कि, आ. भाऊसाहेब कांबळे यांना ८ दिवसापूर्वी थोडासा त्रास वाटू लागल्याने
जवळच्या डॉक्टरांकडून त्यांनी औषधोपचार घेतले. आठ दिवसाच्या औषधोपचारानंतर काल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला.
श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये कांबळे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे लगेच ते श्रीरामपुरातील संतलुक रुग्णालय येथे सुरु असलेल्या उपचार केंद्रात दाखल झाले.
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कांबळे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सौ. मंदाताई कांबळे न्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली.
मात्र त्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. त्याचबरोबर माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांचे चिरंजीव नगरसेवक संतोष कांबळे, संदीप कांबळे यांचेही रॅपिड टेस्ट घेण्यात आली असून त्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved