अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- जगात अनेक अशी लोक आहेत की ज्यांच्यामध्ये इतरांपेक्षा वेगळी कला अंगभूत असते. आपल्या अंगातील वेगळ्या पणामुळे अशा व्यक्ती विशेष बनतात. अशाच एका अनोळख्या व्यक्तीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
नेवासे तालुक्यातील भेंडा येथील सराफ व्यवसायिक सागर पंडित यांची 9 वर्षांची कन्या तन्वी ही डोळे बांधून हाताच्या बोटांनी कागदावर लिहिलेले आकडे, पत्त्यांवरील इंग्रजी अक्षरे, चित्रे, प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रे अचूक ओळखते. तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील नऊ वर्षीय तन्वी पंडित हिने
“मिड ब्रेन ऍक्टिव्हशनच्या” माध्यमातून डोळे बांधून पुस्तक वाचण्याची व चलनी नोटांची किंमत व रंग ओळखण्याची कला आत्मसात केली आहे. मिड ब्रेन ऍक्टिव्हशन (Mid Brain Activation) ही संकल्पना आता चांगलीच रुजू पाहत आहे. औरंगाबाद येथील प्रशिक्षक योगेश दहिहंडे हे याचे धडे 5 ते 15 वर्षे वयो गटातील मुलांना देत आहेत.
असेच प्रशिक्षण घेतलेली 9 वर्षीय तन्वी हिने डोळ्यांवर एक नव्हे तर दोन रुमालांच्या पट्ट्या बांधलेल्या स्थितीत पुस्तकातील पानांचे पान नंबर, त्यातील चित्र, चित्राचा रंग, संख्या, पाच रुपयांपासून दोन हजारांची नोट व तिचा रंग अचूक ओळखणे, पुस्तकावरील चित्रे,
कागदावर लिहिलेली अक्षरे, वाक्य स्पर्श व कागदावर टिचक्या मारून आवाजावरून ओळखणे, डोळे बांधून मोबाईल चॅटिंग करणे, लपुन ठेवलेली वस्तू वासा वरून शोधणे आदी क्रिया अचूकरीत्या करते. तन्वी पंडित ही भेंडा बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलारी वस्ती येथे इयत्ता चौथी मध्ये शिकते.
तिने केवळ 16 दिवसांचा मिड ब्रेन ऍक्टिव्हशनचे ऑनलाइन कोर्स केला. दररोज सकाळी व संध्याकाळी 2 तास ऑनलाइन कोर्स पूर्ण केला. रेकी आणि कुंडलिनी जागृतीव्दारे तन्वीला हे शक्य होत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved